Pune City News
राष्ट्रीय

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”

UPSC

यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे.

सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकली होती.

आता परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून, ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

काही उमेदवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे न्यायालयाला सांगितले.

परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. या याचिकेवर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Related posts

नरेंद्र मोदी हे ‘सरेंडर’ मोदी; राहुल गांधी

Vishal Khandagale

पाकव्याप्त काश्मीरबाबत संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान !

Vishal Khandagale

देशात आणखी चार सरकारी बँकांचे होणार खासगीकरण

Vishal Khandagale

Leave a Comment