Pune City News
राष्ट्रीय

राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश

RAFEL

राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीत समावेश झाला आहे.

राफेल विमानं अवघ्या अर्ध्या तासात अंबाला ते पूर्व लडाखमधील पँगाँगपर्यंतचं अंतर कापू शकतात. सध्या याच परिसरात चीनच्या कारवायांमुळे तणाव वाढला आहे.

त्यामुळे भारतात आलेली पाच राफेल विमानांची पहिली तुकडी याच हवाई तळावर सज्ज ठेवण्यात आली आहे.

राफेलचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यापूर्वी ‘सर्व धर्म पूजा’ करण्यात आली. या सोहळ्याला राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्यासह हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया देखील उपस्थित आहेत.

सध्या अंबाला हवाई तळावर हवाई दलाकडून लढाऊ विमानांची थरारक प्रात्यक्षिकं सादर केली जात आहेत. सुखोई-30 आणि जॅग्वार विमानांनी आकाशात भरारी घेतली असून त्यांच्याकडून विविध प्रात्यक्षिकं सुरू आहेत.

हवाई दलातील इतर विमानांनी प्रात्यक्षिकं सादर केल्यानंतर राफेल विमानं आकाशात झेपली. राफेलच्या माध्यमातून हवाई दलाच्या वैमानिकांनी आपलं कौशल्य दाखवलं.

त्यांनी अतिशय चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

Related posts

विश्वनाथन आनंद ‘येथे’ अडकले!

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या सकाळी 9 वाजता ‘स्पेशल मेसेज’

Vishal Khandagale

उर्वरित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आता नाही : आयओसी

Vishal Khandagale

Leave a Comment