Pune City News
पिपरी चिंचवड

पिंपरीत दोघांचा मृत्यू, नऊ जणांना लागण

Pune City News:- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यात आज (गुरुवारी) आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात शहरातील सात जणांचा तर शहराबाहेरील दोघांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील एकाचा तर शहराबाहेरील एकाचा समावेश आहे.

मंगळवारी तपासणीसाठी पाठविलेल्या संशयीतांचे अहवाल आज (बुधवारी) प्राप्त झाले. या अहवालानुसार शहरातील पाच पुरुषांना तर दोन महिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर शहराबाहेरील ३१ आणि ३६वर्षीय दोन पुरुषांना लागण झाली आहे. शहरातील पाच पुरुष हे ११ ते ३७ वयोगटातील असून, दोन महिला या २५ ते २७ या वयोगटातील आहेत.

बाधित असलेले सात जण हे आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, रहाटणी, चिखली, आणि रावेत येथील रहिवाशी आहेत. तर पुण्यातील एक जण तर शिरवळ (सातारा) येथील एकाचा शहराबाहेरील बाधितांमध्ये समावेश आहे.दरम्यान, या सर्वांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related posts

महापालिका ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग अयशस्वी

Vishal Khandagale

पुणे शहरांत ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून होणार वाढ !

Vishal Khandagale

कोरोना: पुणे लष्कर हद्दीत उपाययोजना निर्देश!

Vishal Khandagale

Leave a Comment