Pune City News
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध घातले असून सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुखमंत्री म्हणाले :

▪️ राज्यात आताची परिस्थिती विचित्र असून कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे.

▪️ कोणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी आमची इच्छा नव्हती. या आधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो.

▪️ फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती.

▪️ ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या.

▪️ मात्र, या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे.

▪️ आपली लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली.

▪️ आपल्या मागणीवरून आता 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे.

▪️ दरम्यान, लक्षण नसलेल्यांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट आज जाहीर

Vishal Khandagale

संचारबंदी झुगारून मंडईत गर्दी

Vishal Khandagale

३ ऑगस्टला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale