पुणे

विभागीय आयुक्तांचे आश्वासन; खासदारांचे आंदोलन मागे

PUNE CITY NEWS :- पुणे शहरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याकरिता ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सोय असलेले जंबो कोविड सेंटरची उभारणी सीओएपी च्या ग्राउंडवर करण्यात येत आहे. हे हॉस्पिटल वेळेत पूर्ण न झाल्याने खासदार गिरीश बापट हे आंदोलन करणार होते.मात्र विभागीय आयुक्तांच्या आश्वासनंतर बापट यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

या सेंटरची पाहणी खासदार खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, भीमराव तापकीर यांनी या कोविड सेन्टरची पाहणी केली.

या ठिकाणी एकूण तीन मंडप उभारण्यात येणार असून प्रशासकीय कामकाज, नोंदणी कक्ष, रुग्ण कक्ष, डॉक्टरांसाठी निवासाची व्यवस्था व कोविड रुग्णांसाठी एकूण ६०० खाटा असून त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा असणार आहे. तर २०० खाटांना ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे.
याकरिता राज्य शासन, पुणे महानगरपालिका , जिल्हा नियोजन समिती व पीएमआरडीच्या निधीतून खर्च करण्यात येत असून लवकरच हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

मात्र विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी खा. बापट यांनी हॉस्पिटल २४ ऑगस्टपासून सुरू करण्याबाबतव्हर आश्वासन दिल्यानंतर बापट यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

Related posts

श्रीक्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध : भुजबळ

Vishal Khandagale

कोरोना ग्रस्थ ! मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत!

Vishal Khandagale

कोरोना संशयिताची आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX