Pune City News
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलाचा बंदुकीत गोळ्या भरतानाचा व्हिडीओ व्हायरल !

pune police

एका ‘पिस्तुलधारी’ तरुणाच्या व्हायरल व्हिडीओतून शहर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.  बिबवेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी या घटनेची स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याच झालं असं, एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने व त्याच्या मित्रांनी बंदुकीत गोळ्या भरतानाचा व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ शायनिंग म्हणून त्याच्या इन्स्ट्राग्राम आयडीला स्टेट्सला टाकला. आता सोशल मीडियाची पावर इथंही दिसून आली. काही वेळातच हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, शहरात सर्वत्र चर्चा फक्त त्याचीच झाली.

मग या व्हिडीओची माहिती बिबवेवाडी पोलीसपर्यंत पोहचली आणि त्यांची धावपळ सुरू झाली.

दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसात गोळीबाराच्या घटना आणि तडीपार गुंडाचा पिस्तुल डान्स यामुळे शहर हादरून गेले आहे. त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांचे देखील हाल बेहाल झाले. बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत शोध सुरू केला. तास-दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबवेवाडी पोलिसांना या अल्पवयीन मुलाला शोधण्यात यश मिळाले. त्यांनी या मुलाकडे चौकशी केल्यानंतर ती बंदुक खेळण्यातली असल्याचे समजले.

बंदूक चायना मेड होती. त्यातून स्ट्रीगर दाबल्यानतर जाळ येतो, अशी बंदूक असून, त्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी सहज म्हणून हा व्हिडीओ काढला आणि इन्स्टाग्रामवर टाकला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. मुलगा दहावीत शिक्षण घेत असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी सांगितले आहे.

Related posts

धक्कादायक प्रकार; गोळीबार करत १४ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

Vishal Khandagale

हरणाच्या शिंगाची तस्करी; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

Vishal Khandagale

“कोरोना” बाबत अफवा पसरवणारी शिक्षिका निलंबित!!

Vishal Khandagale

Leave a Comment