कोरोनामहाराष्ट्र

शिस्त पाळल्यास लॉकडाऊन होणार शिथिल…

Pune City News:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असून लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यास 14 एप्रिलनंतर काही भागांत शिथिल होणार असल्याचा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात 537 कोरोनाबाधित रुग्ण असून 50 जणांना डिस्चार्ज दिला आहे, संचारबंदी आणि लॉकडाउनच्या माध्यमातून आपण काळजी घेत आहोत.अशा परिस्थितीत ट्रेसिंग करणे मोठे आव्हान असून आत्तापर्यंत 9 लाख लोकांचे ट्रेसिंग केले आहे. 2455 टीम्स तयार केल्या असून विविध भागात कार्यरत आहेत.नागपूर, पुण्यातही या टीम्सचे काम सुरु असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केले.

Related posts

कायदा अपंग: फाशीमुळे भावना संपुष्टात

Vishal Khandagale

दिलासादायक! शहरांत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आज घट

भाजपतर्फे आजपासून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX