Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

‘ही’ राज्य बनले कोरोनाचे हॉटस्पॉट!

देशात कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. रोज नवे रुग्ण आणि मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि केरळ ही राज्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे ही दोन राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांपैकी मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये संसर्ग अधिक आहे. मुंबईत अनेक नवे लोक संक्रमित आढळल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने वरळीचा कोळीवाडा आणि गोरेगावला हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे.

मुंबईत आजवर कोरोनामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 167 जणांना लागण झाली आहे. पुण्यात एकाचा मृत्यू झाला असून 34 बाधित आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 12 जण बाधित आढळले आहेत.
राज्यात आजपर्यंत 338 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात 3 हजार 500 लोकांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे विलगीकरण केले आहे. यात परदेसवारी केलेल्या लोकांचाही समावेश आहे. राज्यात सध्या 2 हजार 216 जण निरिक्षणाखाली आहेत.

Related posts

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरची उभारणी अंतिम टप्प्यात

Vishal Khandagale

कोरोना संकटात आरबीआयच्या दिलासादायक घोषणा

कोविडसंदर्भात जागृती व समुपदेशन करण्यासाठी ऑनलाईन ‘द पुणे कोविड बुलेटीन’

Vishal Khandagale

Leave a Comment