राज्यसभेसाठी चर्चेत असलेले राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने पुन्हा संधी नाकारली. त्यावर खडसे यांनी प्रतिक्रिया दिली….
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा काही दिवसांपासून होती. मात्र, मलाच तशी अपेक्षा नव्हती,’ अशा शब्दात खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय पक्षाने घेतला. राज्याच्या राजकारणात मला जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही. त्यामुळे माझ्या नावाची चर्चा असली तरी मला अपेक्षा नव्हती.’
महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून तीन उमेदवार उतरवण्यात आले आहेत.
त्यापैकी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
तिसऱ्या उमेदवारावर भाजपमध्ये बराच खल सुरू होता. या जागेसाठी एकनाथ खडसे, पुण्याचे भाजपचे नेते संजय काकडे यांच्या नावांची चर्चा मागे पडली.
previous post

