Pune City News
Uncategorized

निर्भया प्रकरण : कोर्टाने याचिका फेटाळली!

निर्भया बलात्कार आणि मृत्यू प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याने नव्याने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने आज (दि.19) फेटाळली.त्यामुळे त्याने फाशी टाळण्यासाठी केलेल्या अखेरचा प्रयत्नही अयशस्वी ठरला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी उद्या (दि.20) होणारी सर्व चार आरोपींची फाशी निश्चित मानली जात आहे.
निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अक्षय ठाकूर वगळता इतर तीन दोषी पवन, विनय आणि मुकेश यांच्या कुटुंबीयांनी शेवटची भेट घेतली आहे. फाशी देण्यासाठी कारागृहात पूर्ण तयारी केली आहे. आता फाशी रद्द होणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

Related posts

कोरोना : इटलीच्या मदतीला धावून आला क्युबा देश;

Vishal Khandagale

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे; डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

पुणे शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची 11 मे 2020 पर्यंतची क्षेत्रीय कार्यालय नुसार

Vishal Khandagale

Leave a Comment