Pune City News
पुणेमहाराष्ट्र

हा युद्धाचा भोंगा : उद्धव ठाकरे

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून संदेश दिला.
उद्धव ठाकरे : हे युद्ध आहे, आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे सहकार्य हेच सरकारचे बळ आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.रुग्णालये, डॉक्टर्स, लॅब, जीवनावश्यक वस्तू अशा सगळ्या यंत्रणा तयार आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही.
हे विषाणूंशी युद्ध आहे…war against virus, भोंगा वाजला आहे, युद्ध सुरू झाल आहे…आम्ही दिलेल्या सूचना तुम्ही पाळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.
डॉक्टर, पोलीस, सरकारी अधिकारी चोवीस तास लढत आहेत, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही घरात राहून, गर्दी टाळून त्यांना सहकार्य करा.ट्रेन, बसेसची गर्दी ओसरली आहे. पण अनावश्यक प्रवास अजूनही होत आहे. सरकारी ऑफिसमध्ये – 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील, यासाठीचा निर्णय आम्ही घेतला आहे.
हे परदेशी संकट आहे. बाहेरून आलं आहे. आता आपल्याकडे बाहेरूनही लोक येतील. त्यांना येऊ द्या. सिंगापूरमध्ये आपले लोक अडकले आहेत. त्यांना येऊ द्या, पण काळजी घ्या.
क्वारंटाइन केले असताना बाहेर पडणे चुकीचे आहे. हातावर स्टँप मारलेला असताना काही लोक बाहेर फिरताना दिसले. त्यामुळे कळत-नकळत विषाणूचा प्रसार होतो. हे होऊ देऊ नका.
केंद्र सरकारकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. काही अतिरिक्त सुविधांसाठी मी आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याचं आश्वासन दिले आहे.
अनावश्यक गर्दी टाळा, रेल्वे-बसमध्ये गर्दी करू नका हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. सरकार निर्णय घेऊ शकते, पण आम्ही सध्या काही विचार करत नाहीये. चीनप्रमाणेच आपणही वर्क फ्रॉम होमचा अवलंब करू.चीनला या संकटाने पहिल्यांदा ग्रासले, पण आता चीनच पहिला देश असेल जो या संकटातून प्रथम बाहेर पडेल.

Related posts

क्रेडाई पुणे मेट्रोकडून महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभाग !

Vishal Khandagale

गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाही: महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

Vishal Khandagale

Leave a Comment