Pune City News :- नवी मुंबईहून पुण्याला जाणारा एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 31 मार्च पर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन प्रशासनानं आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 89 तर देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 427 वर पोहोचली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी महाराष्ट्रात अचानक 15 जणांचा टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबई-पुण्यात अनेक नागरिकांची कामानिमित्तानं ये-जा सुरू असते. हा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी एक्स्प्रेस वेवरची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे.
दोन्ही प्रवेश द्वारावर बॅरेकेट्स लावून एक्सप्रेस वे बंद करण्यात आला आहे. तसेच दोन्ही ठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.
previous post

