Pune City News
राष्ट्रीय

30 मार्चऐवजी 30 जूनला संपणार आर्थिक वर्ष; आरबीआयचा मोठा निर्णय

Pune City News:- रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली येथे आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आर्थिक वर्ष 2019 – 20 आता चालू वर्षात 30 जून, 2020 रोजी संपुष्टात येणार आहे, तर आर्थिक वर्ष 2020 – 21 ची सुरुवात 1 जुलै रोजी सुरू होईल, मात्र 31 मार्च 2021 रोजी ते संपुष्टात येईल. त्यानंतर पुढील सर्व आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासूनच होणार आहे.
आतापर्यंत आरबीआय आणि सरकार टी+1 पद्धतीचा अवलंब करतात. म्हणजे आर्थिक वर्ष दोन वर्षांत विभागले जातात. सरकारचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल रोजी म्हणजे ‘टी’ला (पाहिले वर्ष) सुरू होते, तर मार्च 31 ला टी+1 ला (दुसरे वर्ष) संपते. तर आरबीआयसाठी ते 1 जुलैला सुरू होते आणि दुसऱ्या वर्षात 30 जून रोजी संपते.

Related posts

इराणमधून “234” भारतीय मायदेशात!

Vishal Khandagale

‘ही’ राज्य लॉकडाउन लागू करण्याच्या विचारात !

Vishal Khandagale

आयआयटी मुंबई देशात अव्वल मात्र जगात…

Vishal Khandagale

Leave a Comment