Pune City News:- कोरोना विषाणू चा वाढत प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या लॉकडाऊन मुळे नागरिक जीवनावश्यक वस्तू साठी घराबाहेर पडत आहे व गर्दी करत आहे या पाश्र्वभूमीवर आज पासून “सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे.-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील.

★ कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण ०टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली.


