गुन्हे विषयकपिपरी चिंचवड

तरुणाला लोखंडी सुऱ्याने मारहाण !

Pune City News :- मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा त्रास होतो आहे, हे सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला मुलांच्या पालकाने लोखंडी सुऱ्याने मारहाण केल्याची घटना काळखडक, वाकड येथे गुरुवार ( दि.२)रोजी घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून मल्हारी मोतीराम लोंढे (वय २९ रा. वाकड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भरत गिरमा जोगदंड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
◆ प्रकरण काय? :
▪️ गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी जोगदंड यांची मुले क्रिकेट खेळत होती. मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा लोंढे यांना त्रास होऊ लागला.त्यामुळे लोंढे हे आरोपी जोगदंड याला सांगण्यासाठी गेले.मात्र आरोपी जोगदंड याने लोंढे यांच्या डोक्यात लोखंडी सुरा मारला. त्यात लोंढे गंभीर जखमी केले. दरम्यान, लोंढे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

विमाननगर मध्ये सात कोटीं रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

Vishal Khandagale

कोरोना विषाणू बाबत आयुक्तांनी घेतला आढावा !

Vishal Khandagale

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.