Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे : राज्यातील जनतेशी संवाद!

Pune City News:- राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्राने जे दिलं ते वाटतो आहे, पण केंद्राने सगळंच दिलं असा गैरसमज करु नका. सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवरही आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

▪️ काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्याचे काही फोटो आले, सर्वजण मास्क लावून, अंतर ठेवून बसले होते. कदाचित व्हिडीओ कॉन्फरन्सने घेतलेली ही पहिली मंत्रिमंडळ बैठक होती.

▪️ सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यात होते, त्या सर्वांचे धन्यवाद. सर्वांच्या सूचना येत आहेत, सर्वजण टीमवर्क करत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद.

▪️ काल 4 आठवडे झाले, मुंबई-पुण्यात रुग्णात वाढ होत आहे, मला ती नको आहे. ती खाली आणायची आहे.

▪️ कोरोना जगाच्या मागे लागला आहे, पण आपणही कोरोनाच्या मागे हात धुवून लागलो आहोत. आपण घरी बसून आहात, पण घरी राहणंच योग्य आहे.

▪️ हे युद्ध जिंकायचं आहे. हे जिंकल्यानंतर मोठं युद्ध असेल अर्थव्यवस्थेचं. त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. त्यासाठी ताकद, हिंमत असायला हवी.

▪️ हे दिवस असेच राहणार नाहीत, याच्याशी युद्ध करु. हे दिवस गेल्यानंतर तुमचा पाठिंबा मला हवा.
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांच्यासाठी शिवभोजन आहे.

▪️ केंद्राच उत्तम सहकार्य आहे. केंद्राने आपल्याला फक्त तांदूळ दिले. पण हे फक्त काही ठराविक लोकांसाठी आहे.

▪️ भार सर्वांवर आहे. राज्य आणि केंद्र सरकरावर आहे. जनतेवरही भार आहे. केशरी रेशनकार्ड धारकांना 3 रुपये दराने तांदूळ आणि 8 रुपये दराने गहू देत आहोत.

▪️ मास्क घरच्या घरी बनवता येतील, मात्र ते स्वच्छ धुवा, आपला मास्क आपणच टाका, ते टाकताना खबरदारी घ्या.

Related posts

अखेर रिया जेलच्या बाहेर

Vishal Khandagale

ब्रेकिंग! राज्यात आजपासून कडक निर्बंध, राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी

Vishal Khandagale

“WhatsApp’s Group Admin” संदर्भात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

Leave a Comment