Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण नाशिक जिल्ह्यात.

राज्यात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3000 च्या वर गेला आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुबई आणि पुण्यातील असल्याचा अहवाल समोर आला आहे. महाराष्ट्रातील उद्योगनगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या नाशिक मध्ये सुद्धा कोरोना बाधित रुग्णांची संख्या 91 झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण मालेगाव मधील असले तरीही शहरात सुद्धा 10 रुग्ण कोरोनाने ग्रस्त आहे.

नाशिक मध्ये गेल्या 8 दिवसात कोरोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.मुंबई आणि पुणे या पट्टयानंतर राज्यात सर्वाधिक कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण नाशिकमध्ये आढळून आले आहे. परिणामी राज्यातील विकासाचा त्रिकोणी संगम असलेल्या तिन्ही शहरात कोरोना पॉजिटिव्ह जास्त आढळून आले आहे.

राज्यातील औरंगाबाद, अमरावती,नागपुर,नांदेड, सोलापुर,कोल्हापुर,जळगांव आणि अहमदनगर यासारख्या मोठ्या शहरात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण संख्या कमी असताना नाशिकमध्ये मात्र कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्याने होत आहे. एकूणच यामुळे जिल्हा प्रशासनासमोर एक मोठं आव्हान यानिमित्ताने उभे राहिले आहे.

शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 21 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 91 वर पोहोचली असून लवकरच कोरोना पॉजिटिव्ह संख्या शतक पूर्ण करेल यात आता शंका नाही.

Related posts

कोरोना संकट पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टर प्लॅन तयार

Vishal Khandagale

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस

Vishal Khandagale

CRPF च्या आणखी 6 जवानांना कोरोनाची लागन !

Vishal Khandagale

Leave a Comment