Pune City News
कोरोनापिपरी चिंचवडपुणे

पुणे शहरा सहित जिल्ह्यात “मास्क” ची सक्ती : पुणे जिल्हाधिकारी

Pune City News:- पुणे शहरतील कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज मा.नवल किशोर राम, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यानी सर्व प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिलेत की”मास्क” शिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही

पुणे जिल्हयातील नागरिकांनी खालीलप्रमाणे नियमाचे पालन करावे.
1. सर्व व्यक्ती कोणत्याही हेतु साठी व कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जसे की, रस्ता , रुग्णालय, कार्यालय,
बाजार पेठ, इत्यादी बाहेर जातील त्यावेळी त्या व्यक्तीने 3 प्लाय मास्क किंवा कपडयाचा मास्क परिधान करणे
अनिवार्य आहे.
2. सर्व व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक किंवा खाजगी वाहनाने प्रवास करते वेळी मास्क परिधान करणे अनिवार्य
आहे.
3. सर्व कार्यालयामध्ये प्रवेश करणा-या सर्व अभ्यंगतांनी चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील
अन्यथा त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही.
4. सर्व शासकीय निमशासकीय , महानगर पालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील
सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन प्रवेशापासुन ते संपुर्ण कार्यालय सोडेपर्यंत मास्क परिधान करणे
बंधनकारक करणेत येत आहे.
5. सदर मास्क हा प्रमाणीत मास्क असावा किंवा घरगुती कापडी धुण्या योग्य मास्क अथवा मास्क
निर्जुकीकरणानंतर पुन्हा वापरता येऊ शकतात असे मास्क वापरावेत.
6. उक्त आदेश पुढील आदेश होई पर्यत लागू राहील.
उपरोक्त सुचनांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन करणा-या
व्यक्ती विरुध्द कारवाई करणेसाठी पोलीस अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना
अधिकृत करण्यात येत आहे. या दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 व आपत्ती
व्यवस्थापन अधिनियम 2005 याव्दारे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

Related posts

बालेवाडीत दसरा चौकात सिलेंडरचा भीषण स्फोट !

Vishal Khandagale

आमदार सुनिल टिंगरें कडून ५० लाखांचा निधी !

Vishal Khandagale

श्री अग्रसेन महाराज जयंती निमित्त सायकल रॅलीचे आयोजन

Vishal Khandagale

Leave a Comment