Pune City News
राष्ट्रीय

14 एप्रिल नंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवणार नाही चे संकेत…

Pune City News :- कोरोनाच्या संकट काळात देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभा आणि राज्यसभेत पाचपेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या संसदेतील नेत्यांसोबत चर्चा केली.
या बैठकीत सहभागी असलेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊन बाबत खुलासा केला आहे.
यावेळी 14 एप्रिलनंतर एकाच वेळी पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच पंतप्रधानांनी सर्वांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कोणते पावले उचलत आहे यासंबंधी माहिती दिली, तसेच नेत्यांनीही राज्यातील परिस्थितीची पूर्ण माहिती दिली आहे.दरम्यान, लॉकडाऊन संदर्भात नागरिकांच्या मनात संभम असून या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते.

Related posts

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Vishal Khandagale

…अशी भाषा शत्रूच्या देशातही वापरत नाही : शाहनवाज हुसैन

Vishal Khandagale

गुगलने प्ले स्टोरवरून हटवले तब्बल 5,000 बनावट अ‍ॅप्स

Vishal Khandagale

Leave a Comment