Pune City News
कोरोनापुणे

कोरोना : घोरपडीगाव मधील ३० जण रुग्णालयात !

Pune City News :- पुण्याच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घोरपडी गावात करोना विषाणू बाधित रुग्ण सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णाचे नातेवाईक आणि आसपासचे नागरिक, अशा एकूण 30 जणांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यामुळे संपूर्ण घोरपडी गाव सील करण्यात आले आहे. बोर्डाच्या आरोग्य विभागातर्फे परिसरातील 186 घरांमधील 600 नागरिकांची पाहणी पथकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली.

घोरपडी गावात नुकतेच करोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने तातडीने पावले उचलण्यात सुरुवात करण्यात आली असून घोरपडी गावातील तो भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

Related posts

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

Vishal Khandagale

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale

शहरात ऑक्सिजनचा तुटवडा, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर; आबा बागुल

Vishal Khandagale

Leave a Comment