Pune City News
कोरोनापुणे

क्रेडाई पुणे मेट्रोकडून महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभाग !

Pune City News:- कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोने पुढाकार घेतला आहे. केवळ आठ दिवसांच्या विक्रमी कालावधीत पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात क्रेडाई पुणे मेट्रोने अद्ययावत असा अतिदक्षता विभाग (ICU) उभाही केला. या अतिदक्षता विभागाच्या उभारणीसाठी एक कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यकता होती. हा सर्व निधी क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे उपलब्ध करून देण्यात आला.

यावेळी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, पुणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, मुख्य शहर अभियंते प्रशांत वाघमारे, क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी तेजराज पाटील आणि आय. पी. इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.

या अतिदक्षता विभागात खाटा, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्शन मशीन, इसीजी मशीन इत्यादी अशा ४० अद्ययावत उपकरणांचा समावेश असून सध्याच्या काळात कोविड १९ शी लढणा-या रुग्णांना यामुळे अद्ययावत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. महापालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने सामाजिक दायित्व दाखवत क्रेडाईने मदतीचा हात पुढे केला आहे, ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. त्याबद्दल क्रेडाई पुणे मेट्रोचे पुणेकरांच्या वतीनं आभार !

Related posts

दोन्ही महापालिका व प्रतिबंधित क्षेत्र वगळून उद्योग, कारखाने सुरु करता येणार !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ ….

Vishal Khandagale

सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment