Pune City News
पुणे

पुणे शहरातील “हॉट स्पॉट” बाबत पोलीस व महापालिका फुल ऍक्टिव्ह !

Pune City News :- कोरोना विषाणू च्या वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पाच वॉर्डांच्या हॉटस्पॉट परिसरात प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हा परिसर पुणे शहर पोलिस यांच्या साह्याने सील केला. लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी व उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.


पुणे शहरातील पाटील इस्टेट झोपडपट्टी, कामगार पुतळा झोपडपट्टी, ताडीवाला रोड झोपडपट्टी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी येरवडा भागात महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह आज पाहणी केली.

Related posts

हडपसर येथील मेडिकेअर हॉस्पिटलला १४ ऑक्सिजन बेड

Vishal Khandagale

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन

Vishal Khandagale

छत्रपती. शिवाजी महाराजांना अजित पवारांचे वंदन

Vishal Khandagale

Leave a Comment