Pune City News:- सोमवार 18 मे पासून 50 टक्के कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू होण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सहाय्यक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाना कामावर हजर राहण्याचे या आदेशात केंद्राने स्पष्ट केले आहे.
देशात घेण्यात आलेला तिसरा लॉकडाऊन 17 मे ला संपणार आहे. त्यानंतर 18 मे पासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे.मात्र त्याआधीच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 18 मे पासून शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांची शनिवारची सुट्टी लॉकडाऊन असल्याने रद्द करण्यात आली आहे.दिल्लीतील जी शासकीय कार्यालये आहेत ती केंद्र सरकारची असोत किंवा राज्य सरकारची त्यामध्ये 50 टक्के कर्मचारी 18 मे पासून उपस्थित असणार आहेत.

