PUNE CITY NEWS :- संपूर्ण देशावर कोरोना संकट असताना आज विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले आहे. कोरोना संकटाच्या काळात सण-उत्सवांवर निर्बंध आल्याने यावेळी गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे.
आवाहन : प्रशासनाकडूनही नियमांचे पालन करत शिस्तबद्धपणे गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
शुभेच्छा : उत्सवाचे स्वरुप बदलले असले तरी नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट : नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट असो”.
आप सभी को गणेश चतुर्थी की बहुत-बहुत बधाई। गणपति बाप्पा मोरया!
Greetings on the auspicious festival of Ganesh Chaturthi. May the blessings of Bhagwan Shri Ganesh always be upon us. May there be joy and prosperity all over.
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2020

