PUNE CITY NEWS:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वरळी पॅटर्नच्या दाव्यावर सडकून टीका केली आहे. वरळी पॅटर्न वगैरे काहीही नाही, सरकारने आकड्यांची बनवाबनवी थांबवावी, असं मत फडणवीसांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे.
फडणवीस म्हणाले :
▪️ आयसीएमआरने आणि केंद्रीय समितीने जे सांगितलं होतं ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते कोठेही वरळी पॅटर्न म्हटलेच नाहीत.
▪️ मात्र, वरळी पॅटर्न देशभरात स्वीकारणार अशा बातमी प्रकाशित करण्यात आल्या. खरंतर वरळी पॅटर्नमध्ये लक्षणं नसलेल्या संशयितांच्या चाचण्या बंद केल्या होत्या.
▪️ वरळीच्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्या सुरु होत्या. त्या प्रयोगशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबईत केवळ धारावीत कोरोना रुग्ण वाढलेले नाहीत.
▪️ कोरोना रुग्णांची सुरुवात वरळीतून झाली, धारावीत संख्या वाढली. अनेक झोपडपट्ट्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढली.
▪️ मात्र, चांगल्या वस्त्यांमध्येही ही संख्या वाढली आहे. मुंबईतील असा एकही वार्ड नाही जेथे कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे हे दावे चुकीचे आहेत.
▪️ धारावीत रुग्णांची संख्या वाढण्याचं कारण तेथील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं नाही.
▪️ विलगीकरणाच्या मोठ्या प्रमाणात ज्या व्यवस्था उभ्या करायच्या होत्या त्या व्यवस्था उभ्या करण्यात आल्या नाहीत.

