आपल्या एकट्याचे यश नसून राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश असल्याची भावना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले :
▪️ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला हे माझे एकट्याचे यश नसून सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे.
▪️ मुख्यमंत्रीपद निमित्त असून महाराष्ट्राची सेवा घडत असल्याचे महत्त्वाचे आहे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.
▪️ महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला. माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार.
दरम्यान, अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नसल्याची भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

