Pune City News
महाराष्ट्र

शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना जाहीर केलेली १०० कोटींची मदत अतिशय तुटपुंजी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले :

▪️ चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

▪️ तसेच फळबागा आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने जाहीर केलेली १०० कोटींची मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीच्या ७५ टक्के मदत करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्या टर्ममधील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखादेखील आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेऊन मांडला आहे.

Related posts

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांचे मोठे विधान

Vishal Khandagale

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मजुरांनी गावाकडे जाण्याचा प्रयत्न करु नये : गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment