Pune City News
कोरोनापुणे

ताडीवाला रोडला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट !

आज ताडीवाला रोडला  महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिलजी देशमुख साहेबांनी आज भेट दिली.  तसेच ताडीवाला रोड विभागात पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन,व भागातील नेमलेल्या (SPO) विविध संस्था, मंडळाचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून व प्रयत्नातून आज ताडीवाला रोड भाग हा कोरोना मुक्ती च्या दिशेने वाटचाल करत आहे व जवळपास तो आटोक्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांनी भेट दिली व पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन,व त्याच जोडीने काम करणाऱ्या विशेष पोलीस अधिकारी (SPO) यांची भेट घेऊन कौतुकाची थाप दिली व मनोधैर्य वाढविले

या प्रसंगी पुणे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकारी,स्थानिक पोलीस प्रशासन, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी,ताडीवाला रोड भागातील महापालिकेचे आरोग्य सेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी व भागातील विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Related posts

कोरोना- विविध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत दंडात्मक कारवाई

Vishal Khandagale

‘नगररोड क्षेत्रीय कार्यालय’अधिकाऱ्या च्या आशीर्वादाने “गणेश मूर्ती” चा काळाबाजार

Vishal Khandagale

ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

Leave a Comment