देशातील बारा राज्यातील एमएसएमई हबमध्ये १७ हजार ९०४ उद्योजकांना ५९९ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
इमरजन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेअंतर्गत ८ जून रोजीच्या आकडेवारीनुसार ११०९ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याचेही स्पष्ट केले आहे.
आत्मनिर्भर पॅकेजमध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाना तात्काळ सावरण्यासाठी इमरजन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेचा समावेश करण्यात आला होता.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले होते.

