Pune City News
महाराष्ट्र

सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी !

PUNE CITY NEWS :- राज्य सरकारने 28 जूनपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या बाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला.

जिम आणि सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले.

एस टी सेवा, दारु विक्रीसाठी जे सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत, त्याप्रमाणेच नियम पाळून सलून व्यावसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली होती.

एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही असा सवाल सलून व्यावसायिकांनी विचारला होता.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार-पाच दिवसात सलून सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असं आश्वासन दिलं होतं.

त्यानुसार आता सलून सुरु करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. 28 जूनपासून महाराष्ट्रातील सलून सुरु करण्यात येतील.

Related posts

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर!

Vishal Khandagale

पुणेकर चंद्रवेड्या तरुणाची लयभारी कामगिरी पहाच!

Vishal Khandagale

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात याचिका

Vishal Khandagale

Leave a Comment