PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच येथे रुग्णालयांत बेडची संख्याही कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर वाकड येथील एका एका सोसायटीने आदर्श निर्माण केला आहे.
वाकड येथील वेदांता सोसायटीने सीसायटीतच विलगिकरण कक्ष उभारला आहे. या कक्षात डॉक्टर, ऑक्सिजन आणि प्राथमिक अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.
या सोसायटीमधील जवळपास सहा नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी अनेक अडचणींचा सामना या सोसायटीधारकांना करावा लागला होता. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या सोसायटीमध्ये ३११ सदनिका असून यामध्ये दोन हजार नागरिक राहतात.
याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये गॅस शेगडी, ऑक्सिमीटर, थर्मल गण, ऑक्सिजन सिलेंडर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

