महाराष्ट्र

अष्टविनायक-श्रीक्षेत्र ओझर येथील विघ्नहर मंदिरात चोरी..

PUNE CITY NEWS :- अष्टविनायकांपैकी एक असेलेले तीर्थक्षेत्र ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात मंगळवारी( दि.२८) पहाटेच्या सुमारास चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला आहे. या चोरीत चोरांनी गणपतीच्या वर असलेली दीड किलो वजनाची चांदीची छत्री चोरून नेली आहे.

या प्रकरणी ओतूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीवर असलेली अंदाजे दीड किलो चांदीची छत्री चोरांनी पळवली असून तसेच तिजोरी पळवून नेण्याचाही प्रयत्न केला आहे.

मात्र तिजोरीतील रक्कम काढून घेऊन ती मंदिराच्या बाहेरच्या बाजूला फेकून देत. चोरांनी घटना स्थळावरून पळ काढला. कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिर चार महिन्यांपासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तिजोरीत अधिक रक्कम नसावी अशी माहिती गणपती देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही. मांडे यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास ओतूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Related posts

शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

15 सप्टेंबरपासून राज्यात ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम

Vishal Khandagale

‘जनता कर्फ्यू’ कोण बाहेर येऊ शकते, कोण नाही !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX