Pune City News :- दहावी बोर्ड परीक्षा निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. आज 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल जाहीर होईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडली होती.
मार्च 2020 मध्ये एकूण 9 बोर्डात दहावीची परीक्षा झाली होती. या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे.
‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार :
▪️ www.mahresult.nic.in
▪️ www.sscresult.mkcl.org
▪️ www.maharashtraeduction.com

