PUNE CITY NEWS :- खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले वरसगाव धरणही १०० टक्के भरले आहे. त्यात १२.८२ टीएमसी इतका साठा आहे.
आता चारही धरणांचा एकूण पाणीसाठा २८.६१ टीएमसी इतका झालेला आहे. सध्या धरणातून १३ हजार क्यूसेक्सने पाणी सोडले जात आहे. अशी माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वरसगाव धरण मोसे नदीवर बांधण्यात आले आहे.
खडकवासला साखळी धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने या भागातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी चारही साखळी धरणे भरल्याने पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

