रायगड जिल्ह्यातीव महाड इथे तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत सोमवारी संध्याकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडली.
येथे 5 मजली इमारतीत जवळपास 41 कुटुंब राहत होते. त्यातील 60 जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे.
दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 26 लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेतील जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ओफ्रेशन रात्रभर सुरु आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
या कामासाठी 8 ट्रक, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे.
या दुर्घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई तात्काळ देण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.
बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली.
तारीक पॅलेस इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 18 ते 19 जण दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि RCC कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

