Pune City News
पुणेमहाराष्ट्र

राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला असून नागरिकांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अशात आजही राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे विदर्भात आलेल्या पुरामुळे अनेकांची संसार पाण्याखाली गेली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पालघर, ठाणे, नाशिक, नगर मधील काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर विदर्भात काही भागात पावसाचा जोर आज ही राहील.

याच पार्श्वभूमीवर अनेक गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर नदी आणि धरणालगतच्या गावांनाही अलर्ट करण्यात आलं आहे.

Related posts

रिपब्लिकन जनशक्तीचा केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध !

Vishal Khandagale

रस्ता पेठ- मद्रासी गणपतीजवळ इमारतीला आग

Vishal Khandagale

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना’ शहरात लवकरच राबवणार !

Vishal Khandagale

Leave a Comment