Pune City News
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरं खुली करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलन केलं.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करुन आंदोलन केलं.

यावेळी त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत, असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचं आंदोलन करणारच अशी भूमिका घेतली होती.

प्रकाश आंबेडकर म्हणाले :

▪️ पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील.

▪️ यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.

▪️ भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं आणि मंदिरं खुली करण्याचे आदेश देण्याची मागणी करावी.

दरम्यान, 10 दिवसांत प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपूरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला.

Related posts

शाळांचा वेळ कमी करण्याबाबत विचार

Vishal Khandagale

मुख्यमंत्री ठाकरे यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत!

Vishal Khandagale

कोरोना! रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची नावे

Vishal Khandagale

Leave a Comment