Pune City News
महाराष्ट्र

कोरोनाशी एकत्र लढूया; चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यासमोर कोरोनाचे संकट उभे आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना परिस्थितीत राज्य सरकारवर भाजप नेत्यांनी टीकेची एकही संधी सोडली नाही.

आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी राजकारण दूर ठेवून एकत्र येऊया, असे आवाहनच राज्य सरकारला केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात त्यांनी, गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीणमध्येही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे.

विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग आदी असे आपण सर्वजण एकत्रितपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे, यावरील उपाययोजना ठरविणे व कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक आहे’ असं मतही पाटील यांनी व्यक्त केले.

‘सध्याचे संकट पाहता दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ऑक्सिजन बेडसह सुसज्ज रुग्णालय उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related posts

कोरेगाव-भीमा प्रकरणी NIA ची मोठी कारवाई

Vishal Khandagale

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच

Vishal Khandagale

महापौर चषक कॅरम स्पर्धा

Vishal Khandagale

Leave a Comment