भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी सर्वांच्या सहभागानं होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
- यासंदर्भात कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे.
- इंदू मिलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे.
- यासंदर्भात कुठलाही पक्ष वा संघटना असा कोणताही भेदभाव असूच शकत नाही.
- दरम्यान, सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून एक चांगला कार्यक्रम करावा असे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांनी दिले.

