Pune City News
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या अटकेचा निषेध; काँग्रेसचं मुंबईसह राज्यभरात आंदोलन

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी केलेल्या दंडेलशाहीचा महाराष्ट्रात काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाही विरोधात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

▪️ उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर जंगलराज आहे. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

▪️ हाथरस येथील अमानवीय घटनेतील आरोपींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे.

▪️ त्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाऊ दिले जात नाही. काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

Related posts

मजुरांनी गावाकडे जाण्याचा प्रयत्न करु नये : गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी

Vishal Khandagale

कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा पर्याय

Vishal Khandagale

Leave a Comment