मध्य रेल्वेने सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई ते कोल्हापूरसह आणखी आठ गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- बहुतांशी वातानुकूलित एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाडय़ांचे आरक्षण 9 आणि 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
- गर्दीच्या हंगामात लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
- या आठ गाडय़ामध्ये मुंबई-कोल्हापूर स्पेशल डेली, मुंबई -लातूर सुपरफास्ट स्पेशल आठवडय़ातून चार दिवस,
- पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन,
- अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, कोल्हापूर-गोंदिया स्पेशल डेली ट्रेन, मुंबई-नांदेड स्पेशल डेली ट्रेनचा समावेश आहे.

