Pune City News
राष्ट्रीय

शेतकरी आंदोलन चिघळलं; आंदोलकांनी दिल्ली जयपूर हायवे केला बंद

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन चिघळलं आहे.

आंदोलकांनी आपला मोर्चा आता दुसऱ्या ठिकाणांवर केंद्रीत केला असून राजस्थानातल्या शाहजहांपूर इथं हरियाणा सीमेजवळ शेतकऱ्यांनी हायवे बंद केला आहे.दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी वाहतूक वळवली आहे. कृषी कायदे रद्द करा ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून सरकार त्यासाठी तयार नाही. परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या 18 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार आणि आंदोलक संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.

सरकार नव्या कायद्यांमध्ये दुरूस्त्या करण्यास तयार आहे. मात्र आंदोलक त्यासाठी तयार नाहीत त्यामुळे आंदोलन चिघळलं आहे.

Related posts

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी ; न्यायालयाने तिघांना ठरवलं दोषी

Vishal Khandagale

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा सील, शिवराज सिंह चौहान यांचा निर्णय

Vishal Khandagale

पीएम केअर फंडाचा हिशोब द्या !

Vishal Khandagale

Leave a Comment