Pune City News
महाराष्ट्र

फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचे धक्कादायक आरोप; मलिक यांचे प्रत्युत्तर

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणी धक्कादायक आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेमध्ये फडवीस काय म्हणाले? :

आपण मुख्यमंत्र्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणाचे सर्व पुरावे दिले होते मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी काहीही कारवाई केलेली नाही.
● मी आज दिल्लीला जात असून केंद्रीय गृह सचिवांना सर्व माहिती देणार असून सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे.
● काहीच कारवाई होत नाहीये असे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांना दिला गेला. त्यानंतर कारवाई झाली कुणावर तर कमिशनर इंटेलिजन्सवर. त्यांचे प्रमोशन थांबवले गेले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले प्रत्युत्तर :

● महाराष्ट्रात सरकार तयार करत असताना रश्मी शुक्ला सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या.
● कुठेतरी भाजपाच्या एजंट या नात्याने काम करत असताना त्यांना बेकायदेशीरपणे फोन इंटरसेप्ट करण्याची त्यांना सवय लागली होती.
● ज्या अहवालाचा उल्लेख फडणवीस करत आहेत त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता टॅपिंग सुरु होतं. तसंच उल्लेख झालेल्या ८० टक्के बदल्या झालेल्या नाहीत.
● कोणताही मंत्री आपल्या अधिकारात बदल्या करु शकत नाही. जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांसाठीदेखील समिती आहे. त्यामुळे फडणवीस दिशाभूल करत आहे.

Related posts

कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही – नवाब मलिक

Vishal Khandagale

कोरोना! रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची नावे

Vishal Khandagale

शिवसेनेने संसद भवनाच्या आवारात साजरी केली शिवजयंती !

Vishal Khandagale

Leave a Comment