Pune City News
महाराष्ट्र

परमबिर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते.

त्या पार्श्वभूमीवरच परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी परमबीर सिंग यांनी याचिकेत केली होती.

Related posts

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी नियमावली

Vishal Khandagale

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांचे मोठे विधान

Vishal Khandagale

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

Leave a Comment