शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारताने 2-1 च्या फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विराटसेनेने इंग्लंडला विजयासाठी 330 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 322 धावा करता आल्या.
● तर इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद 95 धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड मलानने अर्धशतक झळकावलं.
● टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 3 फलंदाजांना माघारी धाडत शार्दुलला चांगली साथ दिली.

