Pune City News
पुणे शहरमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं -चंद्रकांतदादा पाटील

पुणे शहर :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसं जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावं लागेल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें ना लगावला आहे.

कोरोना संसर्गजन्य आहे. पण त्याचे नियम पाळूनही तुम्ही घरी बसायला सांगत असाल तर ते शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे

सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको. त्यांना सातच्या आत घरात जायचं. दिवसभराचे दिनक्रम चालूच राहिले पाहिजेत. चाचण्या वाढवणं गरजेचे आहेत. ज्याला काहीही लक्षण नाहीत त्यांचेही टेस्टिंग करा. रुग्ण लवकर कळतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

Related posts

शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सातपर्यंत सुरु

Vishal Khandagale

पुणे शहरात 4953 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

खासदार गिरीश बापट यांच्याकडून १ कोटी ६५ लाखाची मदत

Vishal Khandagale

Leave a Comment