Pune City News
कोथरूडपुणे शहर

कुमठेकर रस्त्यावर राज्य शिक्षण परिषदेच्या कार्यालयात आग

पुणे शहर :- कुमठेकर रस्त्यावरील राज्य शिक्षण संशोधन परिषदेच्या कार्यालयातील आवारात ठेवलेल्या टाकाऊ फर्निचरला मंगळवारी दुपारी आग लागली.

आगीत टाकाऊ फर्निचर जळाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

कुमठेकर रस्त्यावर राज्य शिक्षण संशोधन परिषदेचे कार्यालय आहे. तीन मजली इमारतीच्या आवारात तळमजल्यावर लाकडी फर्निचर, जुनी कपाटे ठेवण्यात आली आहेत.

दुपारी पावणेदोनच्या सुमारास अचानक फर्निचरने पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणावर धूर झाला.

या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या कसबा पेठ आणि एरंडवणे केंद्रातील दोन बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कसबा केंद्रातील अधिकारी सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल राजेंद्र पायगुडे, ढमाले, सुरेश पवार, अरगडे, पाण्याचा मारा करून दहा मिनिटात आग आटोक्यात आणण्यात आली.

 

Related posts

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद !

Vishal Khandagale

अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी PMPML च्या ४१ बसेस धावणार

Vishal Khandagale

करोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांचे आरोग्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे गिरीश खत्री यांच्या वतीने आयोजन..

Vishal Khandagale

Leave a Comment