Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी PMPML च्या ४१ बसेस धावणार

पुणे शहर- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील अत्यावश्यक सेवेत काम करणारे दोन्ही महानगरपालिकांकडील कर्मचारी, सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटल मधील कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे शासकीय कर्मचारी इ. करीता दि. ७ एप्रिल २०२१ पासून सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खालील मार्गांवर अत्यावश्यक बससेवा सुरू केली जात आहे, अशी माहिती पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे यांनी दिली.

अ.क्र . मार्ग क्र. पासून पर्यंत :- 

१) १०४ नांदेडसिटी ते डेक्कन
२) ४९ आय.ए.टी. (खडकवासला) ते पुणेस्टेशन
३) ३५४ औंध ते डेक्कन
४) १६६ विमाननगर ते मनपा
५) १५२ विश्रांतवाडी ते मनपा
६) २०४ सांगवी ते पुणे स्टेशन
७) २०४ चिंचवड गांव ते पुणे स्टेशन
८) १५९ मनपा ते वाघोली
९) १५५ मनपा ते लोहगांव
१०) १७० मनपा ते कोंढवा हॉस्पिटल
११) १६५ मनपा ते वडगांवशेरी
१२) १४४ वारजे माळवाडी ते पुणे स्टेशन
१३) ९४ कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
१४) १४४ वारजे माळवाडी ते मनपा
१५) २ कात्रज ते कात्रज
१६) २४ कात्रज ते पुणे स्टेशन
१७) १११ भेकराईनगर ते मनपा

१८) २०७ अ सासवड ते पुणे स्टशेन
१९) ३०५ तळेगांव ते मनपा
२०) ३५८ राजगुरूनगर ते मनपा

  • वरील मार्गांवर अत्यावश्यक सेवेसाठी ४१ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. या बसेस मधून प्रवास करण्यासाठी
    * अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक राहील.
    * ओळखपत्र पाहूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाईल.
    * अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना प्रचलित दराप्रमाणे तिकीट काढूनच या बससेवेचा लाभ
    घेता येईल.

Related posts

पुणे शहरात 4119 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!

लसीकरणासाठी पहिल्या तासात 35 लाख लोकांची नोंदणी

Vishal Khandagale