Pune City News
कोरोनापुणे शहर

पुणे महापालिका खरेदी करणार 25 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

पुणे शहर :- पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी फायदेशीर ठरणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका 25 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेमंत रासने म्हणाले:-

पुणे महापालिकेच्या 8 रुग्णालयात 2 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 800 रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. मागील दोन दिवसनापासून पालिकेच्या रुग्णालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इंजेक्शन मिळाली नाहीत. या पार्श्वभूमीवर तातडीने ही इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणखी 25 हजार इंजेक्शन घेण्याची तयारी आहे. शासनाकडेही यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत असताना खासगी रुग्णालयातील गरजू रुग्णांनांही इमर्जन्सी मध्ये इंजेक्शन मोफत इंजेक्शन मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Related posts

पुणे शहर राष्ट्रवादीचे ‘महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन’

Vishal Khandagale

७ वर्षात मोदी सरकारने देश केला भकास!- रमेश बागवे

Vishal Khandagale

मुळ पुण्याचे असलेले डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील पुरस्कार

Vishal Khandagale

Leave a Comment