पुणे शहर :- पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने वडगाव शेरी विधानसभेत मोठ्या संख्येने रिक्षाचालक बांधवांना “रेशनिंग किट” चे वाटप करण्यात आले. गहू, तांदूळ, डाळी, तेल, साखर व अन्य गरजेच्या वस्तू यात समाविष्ट करून रोजगार बंद असणाऱ्या रिक्षाचालक बांधवांना उदरनिर्वाहासाठी एक छोटा दिलासा देण्याचा हा प्रयत्न.
हा उपक्रम माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाने व पुणे शहर युवक कॉंग्रेस चे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी गृहमंत्री रमेश दादा बागवे, आमदार सुनील टिंगरे, मोहन जोशी, अभयजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष आमीर शेख, वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, बाबा नायडू, दिलीप देवकर, संतोष पाटोळे, वाहिद नीलगर, प्रसाद वाघमारे, अभिजीत साळवे, शानू चलवादी, किरण पाटोळे, निशांत शिरसाट, राजू लोखंडे, अक्षय गायकवाड, सुमित लांडगे तसेच विविध प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी “समाजातील प्रत्येक युवकाने जर वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजातल्या सर्व गरजू व अडचणीतल्या घटकांना मदतीचा हात पुढे करून आपले सुजाण नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडले तर नक्कीच कोणीही अडचणीत राहणार नाही आणि या कठीण वेळेवर सहजपणे मात करून आपल्याला पुढे जाता येईल. असे मत यावेळी राहुल शिरसाट यांनी व्यक्त केले.




